Saturday, September 19, 2009
थोडे EP विषयी
Evolutionary Psychology (EP) हा माझा एक जिव्हाळ्याचा विषय ( मराठीत काय म्हणतात? 'उत्क्रांती मानसशास्त्र'? जाणकारांनी प्रकाश टाकावा.) बऱ्याच वर्षांपूर्वी एका मित्राने Desmond Morris ची ओळख करून दिल्यानंतर त्याच्या 'Naked Ape' आणि 'Intimate Behavior' आदी पुस्तकांची पारायणे झाली. यथावकाश Richard Dawkins, Jared Diamond या दिग्गजांचीही ओळख झाली. त्या सर्वांविषयी सविस्तर नन्तर लिहीन. हल्लीच Geoffrey Miller चे The Mating Mind वाचण्यात आले. मिलेरने अगदी ओघवत्या भाषेत संगीत, साहित्यादी कला यांची उत्क्रांती, जडण-घडण यांचा मानवीय लैंगिकतेशी सांगड घालण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. या मानवीय सांस्कृतिक अंगांना तो ' Fitness Indicators' असा शब्द वापरतो. मोरासाठी त्याचा पिसारा जसा Fitness Indicator तसेच काहीसे. मानवी मेंदूच्या सांस्कृतिक उत्क्रांतीमागे Natural Selective Pressures किंवा Survival Instrict पेक्षा Sexual Instict कसे कारणीभूत आहे, हे मिलेरने दाखवून दिले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
मानवी वर्तनाला सध्याचा आकार मिळण्यात स्वत्व वा अहंकार प्रस्थापित करण्याची प्रेरणा लैंगिक प्रेरणेपेक्षा महत्त्वाची वाटते.
ReplyDelete